मनोरंजनताज्य बातम्या
Trending

NDTV चे अँकर रवीश कुमार यांनी राजीनामा दिल्यानंतर माध्यम विश्वात,सोशल मीडियावर चर्चांना उधान

रवीश कुमार हे २६ वर्षांपासून एनडीटीव्हीशी संलग्न-रवीश कुमार यांचा राजीनामा

अदानी समूहाने एनडीटीव्हीचा ताबा घेतल्यानंतर बुधवारी एनडीटीव्हीचे संस्थापक-प्रवर्तक प्रणॉय रॉय आणि राधिका रॉय यांनी राजीनामा दिला. त्यापाठोपाठ रवीश कुमार यांनीही राजीनामा दिल्याची माहिती एनडीटीव्हीकडून देण्यात आली. या पार्श्वभूमीवर रवीश कुमार यांच्या फॉलोअर्सकडून सोशल मीडियावर एनडीटीव्ही व्यवस्थापनाचा निषेध केला जात आहे. त्यात आता राजीनाम्यानंतर पहिल्यांदाच रवीश कुमार यांनी ट्वीटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, NDTV चे अँकर आणि पत्रकार रवीश कुमार यांनी राजीनामा दिल्यानंतर माध्यम विश्वात आणि सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे ‘रवीश की रिपोर्ट’ किंवा ‘प्राईम टाईम’ शोच्या माध्यमातून त्यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांना वाचा फोडली. मात्र, त्यांच्या राजीनाम्यामुळे माध्यम विश्वात चर्चा सुरू झाली आहे.रवीश कुमार हे गोल्या २६ वर्षांपासून एनडीटीव्हीशी संलग्न होतं. १९९६ साली पहिल्यांदा त्यांचा एनडीटीव्हीशी संपर्क आला. तेव्हापासून त्यांनी आपली पत्रकारिता आणि वृत्तांकनाच्या माध्यमातून समाजातून मोठा पाठिंबा मिळवला. सामान्यांचे प्रश्न मांडण्याची त्यांची हातोटी विशेषत: तरुणांमध्ये प्रचंड चर्चेचा विषय ठरली होती

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button